मराठी विभागाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:
मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड व अभिरुची निर्माण करणे.
मराठी भाषेचे मातृभाषा म्हणून महत्त्व अधोरेखित करणे.
मराठी भाषेतील विविध साहित्यप्रवाहांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणे.
मराठी भाषेचा व्यवहारात अधिकाधिक उपयोग केला जावा यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध क्षेत्रात मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे.
विद्यार्थ्यांकडून साहित्यनिर्मिती व्हावी यासाठी त्यांना प्रवृत्त करणे व प्रोत्साहन देणे.
मराठी विभागातर्फे मराठी साहित्याचे माध्यमांतर या विषयावर राष्ट्रीय ई-चर्चासत्र आयोजित केले गेले.